सह्यमित्रहो,
कधी पुण्यात अक्षरधारा, रसिक किंवा मुंबईत मॅजेस्टिकमध्ये जाल तेंव्हा थोडं निरखून
बघा. किमान दहा-वीस हजार पुस्तकं असतील तिथे,
झाडून सगळ्या विषयांची. आता एक काम करा,
"भटकंती" अशी पाटी
डकवलेल्या पुस्तकांच्या रॅककडे जा. तिथे बघा "सह्याद्री" आणि "सह्याद्रीतील
खेळांबद्दल" कितीशी पुस्तकं उपलब्ध आहेत?
फार फार तर पन्नास-एक असतील. म्हणजे तिथे उपलब्ध असणाऱ्या दहा-वीस हजार
पुस्तकांमध्ये आपल्या जिव्हाळ्याच्या विषयची पुस्तकं फक्त पाच-पन्नास.
आणि त्यातलीही बरीचशी पुस्तकं बहुतेक वेळा उपलब्ध नसतात. किंबहुना काही
पुस्तकं घसघशीत सवलतीत मिळत नाही म्हणून अश्या पुस्तकालयात ठेवली जात नाहीत.
त्यामुळं बरीचशी अतिशय उत्तम पुस्तकं जी सर्व भटक्यांकडे असावीतच असावीत अशी
पुस्तकं भटक्यांपर्यंत पोहोंचत नाहीत. बरं भटकंतीवर लेखन करणारी मंडळी पैसा
कमवण्याच्या हेतूने फारशी लिहीतही नाहीत, त्यांचे सर्वांगसुंदर अनुभव जगासमोर मांडता यावेत एवढ्या
निखळ हेतूने बरचसं लिखाण आजवर झालं आहे. त्यामुळे जोरदार विपणन (marketing)
ही भटकंती वर लिखाण करणाऱ्या मंडळींना जमत नाही. आणि अश्या
सर्व कारणांमुळे अतिशय उत्तम अशी पुस्तकं योग्य माणसांच्या हाती पडत नाहीत.
एखाद्या विषयावर जेवढी जास्त पुस्तकसंपदा उपलब्ध तेवढ्या जास्त लोकांपर्यंत
त्या विषयाचा सार नेता येतो."सह्याद्री" या विषयावर एवढी कमी पुस्तकं
असण्याची कारणं आपणच शोधायला हवीत आणि ह्या विषयावर अभ्यासून बनलेली पुस्तकं
बाजारात यायला हवीत असा यत्नही करायला हवा. या विषयावर उपलब्ध पुस्तकांचा चांगला
खप व्हावा यासाठीही प्रयत्न करायला हवेत. काही पुस्तकं सर्व सह्यभटक्यांनी आवर्जून
खरेदी करायला हवीत.
सह्यमित्रहो,
मागे झालं ते झालं,
सह्याद्री, सह्याद्रीतले विविध खेळ आणि इतिहासावरच्या चांगल्या
पुस्तकांची माहिती व अशी पुस्तकं कुठे उपलब्ध होतील याची माहिती आपण आपल्या www.bhatakantikatta.org
ह्या वेबसाईटवर टाकत आहोत.
कोणाकडे वरील विषयाला अनुसरून काही चांगल्या पुस्तकांची माहिती असेल तर ती shivsahyadrigatha@gmail.com, treks.pune@gmail.com, आणि sagar.pna@gmail.com
ह्या मेल आयडीवर पाठवावीत ती माहिती आपल्या साईटवर प्रकाशित
केली जाईल.
धन्यवाद,
भटकंती कट्टा संघ.
0 comments:
Post a Comment