भटकंती कट्टा…
भटके मनस्वी असतात. वेव्हलेन्थ जुळणाऱ्या मित्रांसोबतचं भटके भटकंती करतात.हे जरी खरं असलं तरी हीच वेव्हलेन्थ थोडी खेळती ठेवायला काय हरकत आहे……?
का? कशासाठी? कोणासाठी? कुठे? कधी? ह्या कट्ट्यावर काय करायचं……?
का?
इथे फक्त "भटकगप्पाष्टक.
शिवराय, सह्याद्री, गड-किल्ले, घाटवाटा, सुळके, जंगले, देवराया, बिबट्या, कॅमेरा, भटकंती ब्लॉग, भटकी पुस्तकं, भटकंती सामग्री इत्यादी इत्यादी, सगळं फक्त भटकंती डॉट कॉम.
कोणासाठी?
सह्याद्री वर मनसोक्त प्रेम करत फिरणारयांसाठी.
इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या भटक्याने शिवराय, मराठेशाही, गड-किल्ले या विषयी बोलायचं.छायाचित्रकार भटक्याने कॅमेरा,लेन्स, aperture, shutter speed, composition या विषयी बोलायचं.
सुळकेगिरी करणाऱ्या भटक्याने दोर, harness, carabiner, knots, belay या विषयी बोलायचं.
प्राणी-पक्षी मित्र भटक्याने जंगल, बिब्बट, साप, तुर्रेवाला गरुड या विषयी बोलायचं.
"भटकंती मध्यवर्ती ठेवून सगळे विषय आपले."
भटक्यांचा कट्टा कश्यासाठी……?
ह्या आगळ्या वेगळ्या कट्याचा अगदी साधा आणि सरळ हेतू.
भटकंती समजून घेणे,भटकंती समजावणे आणि भटक्या कल्पनांना उधळू देण्यासाठी हा "भटकंती कट्टा".इतिहास-गड-किल्ले-सह्याद्री -जंगले यावर गप्पा होतील, विचार मांडले जातील, कल्पना सुचतील, त्या प्रत्यक्षात कश्या आणायच्या यावर खलबतं होतील, आणि यातूनचं सह्याद्रीसाठी-गड किल्ल्यासाठी काहीतरी विधायक घडेल.
"किमान आतातरी संघटनेची शक्ती भटक्यांनी लक्षात घ्यायला हवी."
कधी?
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी, बरोबर सहा वाजता.
कुठे?
राजे शिवाजी क्लांयबींग वॉल, शिवाजीनगर गावठाण
--
आपला,
रवी पवार

0 comments:
Post a Comment